समाज परिषदे
मार्फत दरवर्षी
किमान दोन वधूवर
मेळावे आणि एक
क्रीडा महोत्सव
हे नियमितपणे आयोजित
केले जातात.या
व्यतिरिक्त गुणवंत
विद्यार्त्यांचा
सत्कारही दरवर्षी
केला जातो. तथापि
मांगेला समाजाची
एकूण लोकसंख्या
किती, सुशिक्षीत/अशिक्षित
किती, पदवीधर किती,
एकूण बोटी किती
अशी व्यापक माहिती
कुठेही उपलब्ध
नाही. हि माहिती
उपलब्ध असणे फारच
आवश्यक आहे आणि
त्यासाठी चालू
वर्षात समाजाची
शिरगणती करण्याचा
समाज परिषदेचा
मनोदय आहे. यासाठी
समाज परिषद प्रथम
एका छोट्या गांवात
नमुना चांचणी प्रयोग
करून नंतर गांवोगांवी
शिरगणतीचा कार्यक्रम
आयोजित
करण्याच्या विचारात
आहे. यासाठी मात्र
समाजातील सुशिक्षित
तरुणांची मदत लागणार
आहे. मांगेला समाजाची
जवळजवळ
१०८ गांवे आहेत
आणि त्यामुळे हे
काम पूर्ण करण्या
साठी गावागावांतील
सुशिक्षित तरुण/तरुणीच्या
सहकार्याची फार
गरज आहे.